
कवी केशवसूत हे कोकणाचे साहित्य वैभव*.
*कवी केशवसूत यांच्या कविता या आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत. कवी केशवसूत हे रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच कोकणचे अजरामर साहित्य वैभव असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन दांडेकर यांनी बोलताना केले. कवी केशवसुतांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खेडच्यावतीने कवी केशवसुतांच्या प्रतिमा पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात झाला. या वेळी उपस्थित सदस्यांनी कवी केशवसूत यांच्या कवितांचे वाचन केले. कोकण मराठी साहित्य परिषद खेड शाखेचे अध्यक्ष राजन दांडेकर, उपाध्यक्ष प्रा. संपदा काळे, कविता जंगम, महिला आघाडीप्रमुख प्रा. अनघा तोडकरी, सदस्य शशिकांत मेहता, इकबाल फकी, आबा निकम, किशोर धुत्रे, स्वप्नील वनारे, राकेश देवरूखकर यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.