न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड बु.मध्ये नवागतांचे ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत
संगमेश्वर : नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी संचालित न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. येथे नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर तसेच पहिलीच्या वर्गात नव्याने प्रवेश करणाऱ्या नवागतांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले.शाळेच्या कमानीपासून वाजतगाजत विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यात आले. नवागतांचे स्वागत करताना या विद्यार्थ्यांना पेन,वही, गुलाबाचे फूल व गोड पदार्थ देण्यात आले. अगदी ग्रामीण भागात गोरगरीब आणि शेतकरी मंजूर वर्गातील विद्यार्थी या स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. आज नवीन इमारतीत का कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेकांनी गर्दी केली होती.या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते युयुस्तु आर्ते, पुष्प दत्त इंग्लिश मिडीयम रत्नागिरीच्या अध्यक्ष अरुणा साळवी, आंबेड सरपंच सुहास मायगडे, अकबर आंबेडकर, विजय कदम,अनिरुद्ध मोहिते, निसार केळकर, शोएब भाटकर, मुक्त्यार काझी, माजी उपसभापती परशुराम वेल्ये, सुभाष मुळे, खालीद बोट, संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, सचिव राजेश आंबेकर, अन्वर गोलंदाज, वासुदेव लिंगायत, सलाउद्दीन बोट, जमूरत अलजी, सलीम सय्यद,ओंकार वीरकर,तैमूर अलजी, मुख्याध्यापक नाझीमा बांगी, सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, शिक्षक उपस्थित होते.