
खेड पोलीस कर्मचार्यांच्या वसाहतीची दैनावस्था
जनतेच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेत रक्षक असलेल्या खेड येथील पोलीस कर्मचार्यांच्या वसाहतीची पुरती दैनावस्था झाली आहे. दुरूस्तीअभावी ही वसाहत अखेरची घटका मोजत आहे. वसाहतीतील खोल्या पूर्णपणे पडझडीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे वसाहतीचा वापरच होत नाही. वसाहतीभोवतालचा परिसरही अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. नवीन वसाहतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव लालफितीत अडकून पडल्याचे समजते. नवीन वसाहत प्रस्तावाच्या मंजुरीची पोलीस कर्मचार्यांना प्रतीक्षा आहे.येथील पोलीस वसाहतीचे बांधकाम पूर्णतः ब्रिटीशकालीन आहे. या वसाहतीत २० पोलीस कर्मचार्यांच्या खोल्या आहेत. या खोल्या पूर्णपणे बिकट अवस्थेत आहेत. गतवर्षीचा पावसाळा कर्मचार्यांनी कसाबसा काढला. यंदा मात्र, वसाहतीतील खोल्या पूर्णपणे पडझडीच्या उंबरठ्यावर आहेत. www.konkantoday.com