खेड तालुक्यातील नातूवाडी धरण कामात गैरव्यवहार, चौकशीची मागणी
खेड तालुक्यातील नातूवाडी धरण कामात गेल्या १० वर्षात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उद्योजक सदानंद कदम यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना दिले आहे. नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा तालुक्यातील महत्वाचा प्रकल्प असून या धरणातील पाण्याचा जनतेला पुरेपूर फायदा व्हावा या दृष्टीने प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र शासनस्तरावर मंजूर झालेली कामे ठेकेदार संबंधित पाटबंधारे विभागाचे अभियंता यांना मॅनेज करत कुठल्याही प्रकारची शासकीय निविदा न काढताच कामाचा कार्यारंभ आदेश काढून घेत असल्याची माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे. राजकीय बळाचा वापर करून मंजूर कामांचे वाटप केले जात असल्याचा आरोपही केला आहे. या धरण कामाच्या गैरव्यवहाराची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे.www.konkantoday.com