क्रॉसिंगसाठी थांबलेल्या रेल्वेमधून महिला प्रवाशाचे मंगळसूत्र लांबवले
मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे रेल्वेस्थानक येण्यापूर्वी क्रॉसिंगसाठी थांबलेल्या रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या गळ्यातील ७५ हजार किंमतीचे मंगळसूत्र खेचून चोरट्याने पलायन केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे यापूर्वीच असाच दागिने चोरीचा प्रकार घडला असून प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद समिक्षा संतोष परब (५६, मिरारोड, ठाणे) यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार समिक्षा परब १८ रोजी मध्यरात्री ३ वाजता मडगाव-नागपूर एक्सप्रेस या रेल्वेगाडीतून प्रवास करत होत्या. ही रेल्वेगाडी मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे रेल्वेस्थानक येण्यापूर्वी क्रॉसिंगला थांबली होती. असे असताना परब यांना प्रवासात लागलेल्या झोपेचा फायदा घेवून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून अंधारातून पलायन केले. www.konkantoday.com