
कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित -ना. उदय सामंत
कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असून लोकसभेला सहापैकी पाच जागा जिंकून स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभेलाही कोकणात महायुतीचा विजयाचा स्ट्राईक रेट ८५ टक्क्याहून अधिक असेल, असे स्पष्ट मत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले. कोकण पदवीधर मतदार संघात जे मतदान होईल, त्यातील ७५ टक्के मतदान हे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मिळेल आणि ते विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.www.konkantoday.com