सावंतवाडी-बेळगाव महामार्गावर झालेल्या दोन अपघातांत बेळगाव जिल्हातील तिघा तरुणांचा मृत्यु

सावंतवाडी-बेळगाव महामार्गावर झालेल्या दोन अपघातांत बेळगाव जिल्हातील चौघा तरुणांचा मृत्यू झाला.हे सर्व आंबोली येथे पर्यटनासाठी निघाले होते, मात्र त्यांची ही सफर अखेरची ठरली. पहिल्या अपघातात हिंडगाव फाट्यानजीक मोटार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून दोघे तरुण ठार झाले; तर दुसऱ्या घटनेत आंबोली-नांगरतास येथे दुचाकीची पिकअपला धडक बसल्याने झालेल्या अपघातात गोकाक येथील युवक जागीच ठार झाला, तर दुसऱ्या तरुणाचा उपचार घेतेवेळी मृत्यू झाला.बेळगाव- सावंतवाडी मार्गावर हिंडगाव फाट्यानजीक मालवाहू मोटार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला. दुसऱ्याला दवाखान्यात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मलिक खतालसाहब मुजावर (रा. सांबरे मुदगा, ता. जि. बेळगाव) व दौलत खताल मोमीन (रा. पंत बाळेकुंद्री, ता. जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.दुसऱ्या घटनेत सावंतवाडी-बेळगाव महामार्गावर आंबोली-नांगरतास येथे दुचाकीची पिकअपला धडक बसल्याने झालेल्या अपघातात गोकाक (जि. बेळगाव) येथील युवक जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सादिक इम्तियाज मुल्ला (वय १९) असे मृताचे नाव आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button