विविध मागण्यांसाठी चिपळूण तालुक्यातील सरपंच २४ जूनला मंत्रालयावर धडकणार
सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांबाबत चिपळूण तालुक्यातील सर्व १३० ग्रामपंचायतींचे सरपंच २४ जूनला मंत्रालयावर धडक देणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी तालुक्यातील सरपंच बांधव-भगिनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा होण्यासाठी सरपंच संघटनेने पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांची भेट घेत निवेदन देवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.www.konkantoday.com