वापरच होत नसल्याने कळंबणी रूग्णालयाच्या कर्मचार्यांची निवासस्थाने ओस
खेड तालुक्यातील कळंबणी येथे रूग्णांच्या सेवेसाठी उपजिल्हा रूग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी अधीक्षकांसह कर्मचार्यांसाठी निवासस्थानेही बांधण्यात आली आहेत. मात्र या निवास्थानांचा वापरच होत नसल्याने ही केवळ शोभेची बाहुले बनल्यासारखी उभी आहेत. देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने निवास्थाने अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com