लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता जोमाने कामाला लागा-विनायक राऊत

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेवून आपल्याला मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीत आपला पराभव झाला, तरीही कार्यकर्त्यांनी खचून न जाता येणार्‍या विधानसभा, विधान परिषद निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोमाने काम करून पुन्हा यश खेचून आणा असे आवाहन शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.रविवारी मराठा भवन हॉल येथे राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. धनशक्तीमुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम समाज संपूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठिशी उभा राहिला ही वस्तुस्थिती आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button