मुंबई-गोवा वरील सावर्डे वहाळफाटा उड्डाणपुलाजवळील मार्ग खचला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात अगदी महिनाभरापूर्वीच दुतर्फा वाहतुकीस खुला करण्यात आलेल्या सावर्डे वहाळफाटा येथील उड्डाणपुलाजवळील कॉंक्रीटीटकरणाला भली मोठी भेग गेल्यानंतर त्यामध्ये पावसाचे पाणी जावून रस्ता खचला असून मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवली आहे. कंत्राटदार कंपनीने तेथील १० मीटरच्या भागात डांबरीचा थर टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नागरिकांत संताप पसरल्यानंतर आता महामार्ग विभागाने खचलेला कॉंक्रीटीकरणाचा भाग काढून टाकून नव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. www.konkantoday.com