महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ’ सुरू करण्यात येणार

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला काहीसा फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका समोर ठेवून राज्य सरकार काही कल्याणकरी योजना राबवत असल्याचं दिसून येत आहे.मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून दंड आकारला जात होता. तो यापुढे आकारला जाणार नाही. यासंदर्भातील निर्देश परिवहन विभागाचे आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना देण्यात आले. मात्र, नियम मोडल्यास नक्कीच दंड भरावा लागेल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी माझी भेट घेतली. यावेळी शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ’ सुरू करण्यात येणार आहे. महामंडळाअंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल. चालकाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून ५० हजार देण्यात येतील. मुलांना शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button