
बाबासमोर ठेवण्यासाठी ७ लाख ५० हजार किंमतीचे दागिने घेवून फसवणूक
बिल्व मंगल सोसायटी, उत्कर्षनगर कुवारबांव येथे राहणारे प्रसाद शंकर मराठे यांचेकडून ७ लाख ५० हजार रुपयांचे दागिने घेवून त्यांची फसवणूक केली म्हणून आरोपी सुभाष बाबासाहेब सुर्वे, विश्वशांती संकुल, अभ्युदयनगर नाचणे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी प्रसाद मराठे व त्यांची बहिण सौ. प्राची हिला आरोपी सुभाष सुर्वे याने मी तुमच्या घरातील अडचणी माझ्या ओळखीच्या बाबाकडून दूर करून देतो. त्याकरिता देवासमोर ठेवण्यासाठी तुमचे दागिने पाहिजे आहेत, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी व त्याच्या बहिणीचे ७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेतले. दागिने काम झाल्यानंतर परत आणून देतो असे सांगितले परंतु प्रत्यक्षात त्याने दागिने परत न देता फसवणूक केली म्हणून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com