
श्री गणेश विसर्जन बाबत दापोली नगरपंचायतीचे स्पष्टीकरण
श्री गणेश विसर्जन विविध वर्तमानपत्रात आलेल्या श्री गणेश विसर्जनाबाबतच्या बातम्यांच्या अनुषंगाने दापोली शहरातील नागरीकांना कळविणेत येते की, महाराष्ट्र शासन गृहविभाग यांचे गणेशोत्सव साध्या पध्दतीने
साजरा करण्याबाबतचे दि.11.07.2020 चे परिपत्रक, मा. न्यायालयाचे आदेश तसेच मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मधील सूचनांनुसार दापोली शहरामध्ये श्री गणेशमुर्तीचे विसर्जन करणेत येत आहे. याबाबत सर्व नागरीकांना यापूर्वीच विविध माध्यमातून कळविणेत आलेले आहे.विविध वर्तमानपत्रात आलेल्या श्री गणेशविसर्जनाबाबतच्या बातम्यांच्या अनुषंगाने पुन:श्च एकदा कळविणेत येते की, महाराष्ट्र शासन गृहविभाग यांचे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबतचे दि.11.07.2020 चे परिपत्रक, मा. न्यायालयाचे आदेश तसेच मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मधील सूचनांनुसार पालन करून तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरीक
स्वत: देखील त्यांचे स्तरावर विसर्जन करू शकतात.मुख्याधिकारी, *दापोली नगर पंचायत*, *दापोली*.
www.konkantoday.com




