
गुहागर तालुक्यातील मोडकाघर-तवसाळ रस्त्यावर झाड कोसळल्याने बुलेटस्वार गंभीर.
गुहागर तालुक्यातील मोडकाघर-तवसाळ रस्त्यावरील पेठे कंपनीसमोर रस्त्यालगत असणारे आकेशियाचे झाड सोमवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास सुशांत सुनील आरेकर (रा. पालशेत) या बुलेट चालकाच्या अंगावर कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी लाईफ केअर रुग्णालयात हलवण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.रस्त्यालगत असणारे आकेशियाचे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. यादरम्यान, पालशेतवरुन गुहागरला जाणारा बुलेटस्वार सुशांत सुनील आरेकर याच्या बुलेटच्या दर्शनी भागावरच हे झाड कोसळले. यामध्ये बुलेटस्वाराच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत झाली. त्याला प्रथम शृंगारतळी येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर अधिक उपचारासाठी चिपळूण येथे लाईफ केअर येथे पाठवण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर काहीकाळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.www.konkantoday.com