सामाजिक वनीकरण विभागाकडून शेतकर्‍यांना खैर वृक्षाची रोपे मोफत मिळणार

कोकणातील डोंगराळ जमिनीत मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस व जमिनीमध्ये खैर वृक्षाची होणारी वाढ लक्षात घेवून येथील शेतकरी वर्गाने खैर वृक्षाची अधिक मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न साधेल असे मत जिल्ह्यातील प्रसिद्ध कात उत्पादक सचिन पाकळे यांनी व्यक्त करून कोकणातील शेतकरी वर्गास ओसाड जमिनीवर खैर लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.खैर वनस्पतीपासून कात उत्पादीत होतो. तसेच काताच्या पावडरचा लेदरसाठी, तसेच कातापासून तयार होणार्‍या टेनीन या उत्पादनाला परदेशात मोठी मागणी आहे. या खैराच्या झाडांवर प्रक्रिया करून तयार केलेला उत्पादीत माल मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होत आहे. त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे. जिल्ह्यात या लाकडाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे, असेही पाकळे म्हणाले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button