
वृक्ष लागवड करून झाडांमधून मिळणारी हवा व ऑक्सिजन तयार केले पाहिजे -शौकतभाई मुकादम
वृक्ष लागवड झाली नाही, तर पाऊस लागणार नाही आणि पाऊस लागला नाही तर धरणातून पाणी साठा होणार नाही, मग वीजही तयार होणार नाही, मग पंखा, एसी कसे चालणार. उन्हाळ्यामध्ये भरमसाठ उष्णता वाढते त्यावेळी पंख्याची व एसीची आवश्यकता भासते. वृक्ष लागवड झाली नाही तर हे सर्व बंद पडेल, मग अशा वेळी झाडांची हवा उपयोगी पडेल. त्यामुळे जबरदस्त वृक्ष लागवड करून झाडांमधून मिळणारी हवा व ऑक्सिजन तयार केले पाहिजे, म्हणून बाकी कशावरही विश्वास न ठेवता झाडांवरच विश्वास ठेवा, असे आवाहन माजी सभापती पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.www.konkantoday.com




