लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्याने उड्डाण पुलाचे काम बंद पाडण्याचा नागरिकांनी घेतला पवित्रा
लांजा शहरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शनिवारी शहरातील नागरिकांनी उड्डाण पुलाचे काम बंद पाडण्याचा अचानकपणे पवित्रा घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था, दुतर्फा साईडपट्ट्या तयार करण्याचे आदेश ठेकेदार असलेल्या ईगल कंपनीला दिले आहे. राजापूर प्रांतानी याची दखल घेवून पाईपलाईन, गटारे, साईडपट्ट्या यांना पर्यायी जागा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.नियमित पावसाला सुरूवात झाल्याने उड्डाण पुलाचे काम सुरू असलेल्या कोर्ले फाटा ते साटवली फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गटारे, सर्व्हिस रोड नसल्याने रस्त्यावर चिखल साचून वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. या भागात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.www.konkantoday.com