
लांजा बसस्थानकातून बससेवा पूर्ववत मात्र प्रवेशद्वारात खड्ड्याचे व चिखलाचे साम्राज्य
कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी तीन आठवडे बंद ठेवण्यात आलेल्या लांजा बसस्थानकातून शुक्रवारी १४ जूनपासून बससेवा पूर्ववत करण्यात आली. एकीकडे नवीन कॉंक्रीटीकरणाचे काम झाले असताना मात्र दुसरीकडे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य झाले आहे.लांजा बसस्थानक कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी २२ मे पासून बंद ठेवण्यात आले होते. अखेर २३ दिवसांच्या कालावधीनंतर बसस्थानकातून बस सुरू झाल्या आहेत. मात्र बसस्थानकातील कॉंक्रीटीकरणाचे काम जिथे संपले आहे, तिथपासून पुढील भागाचे कॉंक्रीटीकरण झाले नसल्याने त्या भागाची चाळण झाली असून खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य झाले आहे. www.konkantoday.com