रिल्स बनविताना कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणीने आपला जीव गमावला
संभाजीनगर येथील पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या सुलिभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात रिल्स बनविताना कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. कार चालवत रील बनवत असताना दरीचा अंदाज न आल्याने हा अपघात झालाही घटना सोमवारी (दि.17) दुपारी 2 च्या दरम्यान घडली.सुलिभंजन पर्वतावर असलेल्या दत्तधाम मंदिर येथे श्वेता दीपक सुरवसे (23) रा.हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर व शिवराज संजय मुळे (25) रा. हनुमान नगर हे दोघे टोयाटो इटिऑस गाडीने सुलिभंजन येथील दत्त मंदिरात दर्शन व पर्यटनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी या परिसरात काही छायाचित्रे घेतली. यानंतर श्वेताने गाडी चालवत रील बनवूया म्हणत गाडीमध्ये बसून ती रिव्हर्स घेत शिवराज मुळे यास मोबाईल मध्ये व्हिडीओ करण्यास सांगितले. तिला फारशी चांगली गाडी चालवता येत नसतानाही आग्रह करत तिने गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. गाडीची स्टेरिंग इकडे फिरवल्यावर गाडी कुठे जाईल, असे विचारत ती चालवत होती. गाडीमागे घेत होती. शिवराज तिचा व्हिडीओ करत होता. गाडी दरीकडे जात असल्याचा अंदाज या दोघांनाही आला नाही.शेवटच्या टप्प्यामध्ये गाडी दरीकडे जात असल्याचा अंदाज येताच शिवराज याने व्हिडीओ करत असताना हातातील मोबाईल फेकत कारकडे धाव घेतली. मात्र कार मोठ्या गतीने दरीमध्ये कोसळली. तीव्र उतार असलेल्या कपारीतून कार आदळत व वेगाने खाली जात असताना तिचे अनेक भाग तुटून पडत होते. 500 फूट खाली कोसळल्यानंतर अपघातग्रस्त कार एका जाळीमध्ये अडकली. मात्र तोपर्यंत गाडीच्या अक्षरशा ठिकर्या उडाल्या होत्या. यामध्ये श्वेता गंभीर जखमी झाली. अपघाताचा आवाज व आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी दरीमध्ये उतरून धाव घेत अपघातग्रस्त गाडीतून श्वेताला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय रत्नपूर येथे दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com