रत्नागिरी शहरातील हयातनगर हाऊसिंग सोसायटी मधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडला

रत्नागिरी शहरातील हयातनगर हाऊसिंग सोसायटी मधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडला असून ८२ हजाराचा मुद्देमाल पळविला. शहर पोलिस ठाण्यात संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) ते शनिवारी (ता. १५) ला सकाळी हयातनगर येथे निदर्शनास आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हयातनगर हाऊसिंग सोसायटी मधील फ्लॅट न ३०३ चा पुढील लाकडी दरवाजाला लावलेले कुलुप काढून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुम मधील लाकडी बेडमध्ये ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवलेले ३० हजार रुपयांची एक सोन्याची बांगडी, १६ हजाराचे कानातील जोड, १२ हजाराची चेन असा ८२ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी सफुरा जाविद डांगे (४३) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button