भरारी पथकांमार्फत खत वितरणावर कृषि विभागाची करडी नजर
रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १४ हजार मे. टन खत मंजूर झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार मे. टन जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्याचे वितरण सध्या सुरू आहे. या बियाण्यांवर, तसेच खत वितरणावर कृषि विभागाची करडी नशर असणार आहे. यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.जिल्ह्यात सध्या मान्सूनने सुरूवात केल्याने बळीराजा शेतीच्या कामाला गुंतलेला दिसत आहे. या खरीप हंगामासाठी कृषि विभागही सज्ज झाला असून शेतकर्यांना बियाणे व खत योग्य दरात, गुणवत्तापूर्वक मिळावे, यासाठी भरारी पथकामार्फत कृषी विभागाची करडी नजर असणार आहे. www.konkantoday.com