
अवैध मच्छिमारी करणार्या दोन नौका मत्स्य विभागाने पकडल्या
समुद्रात यांत्रिकी नौकेद्वारे मच्छिमारी करण्यास बंदी घातलेल्या काळामध्ये मच्छिमारी केल्याचा आरोप ठेवून दोन नौका मत्स्य व्यवसाय विभागाने पकडल्या आहेत. यातील ़एक पर्ससीन आणि दुसरी मिनी पर्ससीन नौका आहे. यातील एक नौकेचे नाव अरहान, तर दुसर्या नौकेचे नाव आयशा असे आहे.पावसाळी मासेमारी बंदी सुरू झाली आहे. या बंदीकाळात यांत्रिकी नौकेद्वारे समुद्रात मासेमारीला १ जूनपासून बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीमध्ये दोन नौका समुद्रात मासेमारी करत असल्याचे आढळून आल्याचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी सांगितले. यातील एक नौका मिरकरवाड्यातील असून दुसरी फणसोपची आहे व त्यावर कारवाई केली.रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५२० नौका असून त्यातील २ हजार ७४ यांत्रिकी नौका आहेत. या यांत्रिक नौकांना १ जून ते ३१ जूनपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी आहे.www.konkantoday.com