सिंधुदुर्गातील तरुणाने आईच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने घाटकोपर येथे रेल्वेरूळावर उडी मारून जीवन संपवले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठमुंबरी येथील तरूणाने आईच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने घाटकोपर येथे रेल्वेरूळावर उडी मारून जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.हितेश नंदकुमार गावकर (२७) असे या तरूणाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, मिठमुंबरी येथील नंदकुमार गजानन गावकर हे पत्नी सुषमा व मुलगा हितेश याच्याबरोबर राहतात. सुषमा या एका आजाराने त्रस्त होत्या. सुषमा यांच्या आजारावरील उपचारासाठी त्यांना घेऊन नंदकुमार व मुलगा हितेश चार दिवसापूर्वी मुंबई येथे गेले होते. रविवारी (दि.१६) सकाळी दादर येथील सुश्रुषा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचे कॅन्सरचे निदान केले याची माहिती सुषमा यांना मिळताच त्यांना जबर मानसिक धक्का बसला. यामध्येच सुषमा यांचे आकस्मिक निधन झाले.या घटनेचा परिणाम त्यांचा मुलगा हितेश याच्यावर झाला. आईची अंतयात्रा निघाली परंतू या अंतयात्रेत हितेश उपस्थित नव्हता. अंतयात्रेच्या वेळीच हितेश याने घाटकोपर येथे रेल्वेरूळावर झोकून देत रेल्वेखाली आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती कुटुंबियांना समजली. या घटनेने मिठमुंबरी गावावर शोककळा पसरली आहे.www.konkantoday.com