सत्य जेव्हा नारायण राणे साहेबांनी मांडलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राऊतांना मिरच्या लागल्या.- आमदार नितेश राणें
_उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी कोकणातील स्वाभिमानी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केले आहे. कोकणात नारायण राणेंनी पैसे वाटले, असा आरोप संजय राऊतांनी केला होता.आता नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.नितेश राणे म्हणाले की, “कोकणातल्या जनतेने लोकशाही पद्धतीने शिवसेनेला नाकारलं, हे सत्य जेव्हा नारायण राणे साहेबांनी मांडलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राऊतांना मिरच्या लागल्या. पैसे घेऊन मतदान केलं, असं संजय राऊत आणि विनायक राऊत म्हणतात. याचा अर्थ कोकणातला सामान्य मतदार पैसा खातो समजायचा का? आमच्या कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की, आतापर्यंत कुठल्याही सरकारकडे कर्जमाफी मागितली नाही. घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणं ही कोकणातल्या जनतेची सवय आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून त्यांना नेहमी प्रोत्साहनकारक निधी जाहीर केला जातो. त्यामुळे कोकणातल्या स्वाभीमानी जनतेचा कुणी अपमान करत असेल तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा कोकणातली जनता त्यांच्या शत्रुला उत्तर देईल,” असे ते म्हणाले.www.konkantoday.com