शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, माजी खासदार विनायक राऊत यांचा राणेना इशारा
*कोकणात भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनरवॉर रंगले आहे. कोकणातून शिवसेना संपवली या आशयाचे बॅनर्सही काही भागात लावण्यात आले होते. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे. आज विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत ‘शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले.विनायक राऊत यावेळी म्हणाले, नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांना मी चार वेळा पराभवाची धुळ चाखली आहे. आता पैशाचा, धनशक्तीचा वापर करुन जरी काटावर पास झालेले असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा करणे म्हणजे स्वत:ला संपवण्यासारखे आहे. शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे.बॅनरबाजीला फार महत्त्व देत नाही त्यावर भाष्य करणार नाही.”ते पुढे म्हणाले, “कोकणातून शिवसेना संपवण्याचा असूरी आनंद जर फडणवीस व नारायण राणे घेत असतील अशा लोकांना कोकणवासीय योग्य वेळी जागा दाखवतील. लोकसभा निवडणूकमध्ये करोडो रुपयाचा चुराडा करुन मतं मिळवली आहेत.” असा आरोप राऊत यांनी केलाwww.konkantoday.com