शिवसेनेचा पारंपरिक नसलेला नवा मतदार ठाकरे गटाला मिळाल्याने उत्साहाचे वातावरण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला तरीही चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना सुमारे १९ हजार मतांचे मताधिक्य मिळाले.या मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे. भाजपवर नाराज असलेला हा समाज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे वळला आहे. मुस्लिम मोहल्ल्यातून ठाकरे गटाचे राऊत यांना सर्वाधिक मतदान झाल्याचे निवडणूक निकालानंतर आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.शिवसेनेचा पारंपरिक नसलेला नवा मतदार ठाकरे गटाला मिळाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चिपळुणात महाविकास आघाडीचाच दणका पाहायला मिळाला.www.konkantoday.com