वीज कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन तुटलेल्या विद्युत तारा तीन तासात दुरुस्त केल्या, नाचणे भागातील ग्रामस्थांना दिलासा
* नाचणे संभाजी नगर हद्दीत वीज तारावर सुकी झावूळ पडून शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या दरम्यान स्पार्किंग होवून पोलवरील 3 तारा तुटून विद्युतपुरवठा बंद झाला त्याबाबत एमआयडीसी मधील एमएसइबी नं 3 च्या ऑफिस ने त्याची दखल घेत वीरेंद्र जाधव लाईनमन व त्यांची 6 जणांच्या टीम ने दखल घेत रात्री 10 वाजेपर्यंत तारा जोडून विद्युत पुरवठा चालू करून लोकांना दिलासा दिला त्यामुळे सर्वानी त्यांना धन्यवाद दिले. घरामध्ये मध्ये येणा-या माडांची झावूळ कट करण्यास सहकार्य करावे असे जाधव तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.वागपैंगन व श्री पक्वाने यांनी केले आहे.तथापी वीज कामगारांना लाईन वर काम करताना त्यांना लाईट वाले हेल्मेट महावितरणने देणे आवश्यक आहे कारण लाईटसह त्यांना लाईनवर काम करणे सुलभ जाईल.