मासे गरविण्यासाठी मिऱ्या येथे गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मिऱ्या समुद्रावर मासे गरवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला त्यातील एकाला वाचवण्यात यश आले पाली चरवेली येथील तिघेजण दर सोमवारी मिऱ्या बंदर समुद्रावर मासे गरवण्यासाठी येत असत आज सायंकाळी ते तिघेजण मासे गरवत असताना यातील एकाच्या गरीला मासा लागला तो काढण्यासाठी वाकला असता मोठी लाट आली आणि त्या लाटेबरोबर तो पाण्यात खेचला गेला. बरोबरच्या सहकाऱ्याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही गटांगळ्या खाऊ लागला यातील एकाला वाचवण्यात आले मात्र दुसरा पाण्यात बुडाला. बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button