दुरुस्तीच्या कामामुळे साखरपा स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर हॉटेल संकेत येथील शिवाजीचौकात
साखरपा एसटी बसस्थानक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू झाले आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाल्यामुळे पावसाळ्यात बसस्थानकात गाडी नेणे आणि आणणे जिकीरीचे झाले होते तसेच खड्ड्यांमुळे प्रवाशांनाही चालणे कठीण होत होते. सध्या बसस्थानकातील रस्ता खड्डेमुक्त करण्याचे काम जोरात सुरू आहे. या कामामुळे एसटी गाड्या स्थानकात जात नाहीत. स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर हॉटेल संकेत येथील शिवाजीचौकात करण्यात आले आहे. इथेच सध्या एसटी बस थांबून सुटत आहेत. या स्थलांतरामुळे काही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com