जगातील सर्वात उंच स्टील आर्च रेल्वे पूल चिनाब ब्रिजवरून रेल्वे धावली
* आता भारतीय रेल्वे आणखी एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. काश्मीर येथे स्थित असलेला जगातील सर्वात उंच स्टील आर्च रेल्वे पूल चिनाब ब्रिजवरून रेल्वे धावली आहे. रेल्वे विभागाने सांगलदान ते रियासीपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे, यामध्ये चिनाब ब्रिजचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे आता लवकरच भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या पुलावरून प्रवास करताना दिसेल.चिनाब ब्रिज हा 359 मीटर उंच असून तो जो पॅरिसच्या आयफेल टॉवरलाही मागे टाकतोय. चिनाब नदीवर हा ब्रिज पसरलेला आहे. देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत पहिल्या यशस्वी टेस्टिंगबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, पहिली चाचणी ट्रेन सांगलदान ते रियासीपर्यंत यशस्वीपणे धावली आहे, त्यात चिनाब पूलचा सुद्धा समावेश होता. USBRL साठी सर्व बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे, फक्त बोगदा क्रमांक 1 अंशतः अपूर्ण राहिला आहे.www.konkantoday.com