गरज सरो वैद्य मरो’चे उत्तम उदाहरण., प्रकाश आंबेडकर ठाकरेंवर संतापले

*मुंबईतील हा निकाल पाहता येथील जनता अजूनही बऱ्यापैकी ठाकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मतदारांचे आभार मानण्यात आले होत. मात्र, हे आभार मानताना ठाकरे यांनी दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख न केल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे प्रचंड संतापले आहेत.प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘गरज सरो वैद्य मरो’चे उत्तम उदाहरण. उच्चवर्णीय हिंदू नी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआ ला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेलwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button