
रत्नागिरी शहराच्या खालच्या भागातील अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले.
रत्नागिरी शहराच्या खालच्या भागातील अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले आहे रत्नागिरी शहराच्या खालच्या भागातील अंतर्गत रस्ते नवीन रस्त्यांनी जोडले जात आहेत.त्याचबरोबर जे जुने अरुंद रस्ते आहेत त्या रस्त्यांचे रुंदीकरण करताना अंतरात तडजोड करून रस्त्यांचे रुंदीकरण करून घ्यावे, असे रत्नागिरी नगर परिषदेला निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगर परिषदेने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.रत्नागिरी मध्यवर्ती स्थानकाच्या खालचा भाग हा फारच दाटीवाटीचा आहे. त्यामुळे पूर्वीपासून असलेले काही अंतर्गत रस्ते 8 ते 10ा फूट रुंदीचे आहेत. रत्नागिरी शहर विकसित करण्यासाठी मारूती आळीतील रस्त्यांसारखे अरुंद रस्ते 30 ते 40 फूट रुंद व्हावेत, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते रुंदीकरणात काहींची जागा आणि घरांचा काही भाग जाणार असल्याने काही ठिकाणी रुंदीकरणाला विरोध झाला. त्यामुळे रुंदीकरणाची ही प्रक्रियाच थांबून गेली होती.