
खेड शहरात रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला अचानक आग
खेड शहरातील तीनबत्तीनाका येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली असून दुचाकीस्वाराचे नुकसान झाले. येथील नगर परिषदेच्या अग्निशामक दलातील कर्मचार्यांना आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. तीनबत्तीनाका येथील एका हॉटेलसमोर एम.एच. ०१ ए.एफ. १२८३ क्रमांकाची दुचाकी उभी होती. या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. www.konkantoday.com