एनडीआरएफची तुकडी शनिवारी चिपळूण शहरात दाखल

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासह मदतकार्य राबविण्यासाठीची प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) तुकडी शनिवारी चिपळूण शहरात दाखल झाली.पूरपरिस्थितीच्या काळात बचावकार्यासाठी आवश्यक तयारी सोमवारीपासून केली जाणार आहे. या तुकडीमध्ये एक अधिकारी आणि २९ जवान आहेत. पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्याकडून मदत कार्य केले जाणार आहे.जून महिना अर्धा झाला तरी पावसाचा जोर म्हणावा तेवढा नाही. आतापर्यतचा इतिहास पाहता जूनच्या शेवटच्या आठवडयात पाऊस धुमाकूळ घालतो. २०२१ मध्ये जूनअखेर अतिवृष्टी झाली होती. राज्य शासनाने त्याची दखल घेत मागील चार वर्षापासून पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफचे जवान चिपळूणला पाठवले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button