शिरगांव कृषी संशोधन केंद्राने कोकण सुहास’ ही नवीन सुवासिक भात बियाणाची जात निर्माण केली

कोकण कृषी विद्यापिठांतर्गत येथील शिरगांव कृषी संशोधन केंद्राने २०१५ मध्ये विकसित केलेल्या सुपर बासमती या भातबियाण्यांवर गॅमा किरणांची प्रक्रिया करून ‘कोकण सुहास’ ही नवीन सुवासिक जात निर्माण केली आहे. या भातजातीला महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापिठाच्या ५२व्या संयुक्त कृषी समितीने अकोला येथे झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील हंगामात या कोकण सुहास भातबियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.कोकणातील शेतकरी गेली काही वर्षे चांगल्या प्रतीच्या तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बासमती भातपिकाच्या लागवडीसाठी भातबियाण्यांची संशोधन केंद्रात विचारणा करत होते. कोकणात खरीप हंगामात भात फुलोऱ्याला येते तेव्हा तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळे सुवासिक भाताला कोकणात अपेक्षित वास येत नाही. भाताचा वास हा मुख्यत्वे जमिनीचा प्रकार व तापमान या दोन मुख्य घटकांवर अवलंबून आहे. या सर्व बाबींचा विचार करून शिरगाव कृषी संशोधन केंद्राने सुपर बासमती या भातजातीच्या बियाण्यावर गॅमा किरणांची प्रक्रिया केली. त्यामधून नवीन सुवासिक जात निर्माण करण्यात यश आले. हे वाण महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापिठातून ‘कोकण सुहास’ या जातीला मान्यता देण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button