राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांना जाहीर

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टतर्फे दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे.शाहू जयंतीच्या निमित्ताने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. हा सोहळा २६ जूनला सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणे समाजात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी पुरस्कारासाठी ज्‍येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांची निवड करण्यात आली आहे. रोख एक लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार १९८४ पासून दिला जातो.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button