रत्नागिरी जिल्ह्यात उत्खननासाठी अप्पर जिल्हाधिकार्यांची परवानगी आवश्यक
रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी होणार्या उत्खननातून होणारी महसूल चुकवण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या बेलगाम उत्खननामुळे पर्यावरणाचीही हानी होण्याचे प्रमाण वाढते आहे. या सार्यांवर आळा बसवण्यासाठी आता अप्पर जिल्हाधिकार्यांकडून ना हरकतचा परवाना मिळवणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठे प्रकल्प सुरू आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग, मिर्या-नागपूर महामार्ग तसेच विविध धरणांच्याा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई सुरू असते. काही ठिकाणी तर खडी व वाळूसाठी चालणार्या प्रक्पासाठीही डोंगर कापले जात आहेत. या प्रकल्पातून होणार्या उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याचे प्रमाण आता वाढते आहे.www.konkantoday.com