रत्नागिरी जिल्हा गो तस्करी करणार्या वाहनांची तपासणी करण्याची मागणी
रत्नागिरी जिल्हा हा गो तस्करांसाठी मोक्याचे ठिकाण बनला आहे. येथे गो तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी जागोजागी चौक्या लावून वाहनांची कसून तपासणी व्हावी, अशी मागणी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.या विषयासंदर्भात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे या धारकर्यांनी भेट घेतली. यावेळी गो तस्करी व गो रक्षण या विषयावरती चर्चा करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा हा गो तस्करांसाठी मोक्याचे ठिकाण बनला आहे. कारण इथली जनता शांत व संयमी आहे. याचाच फायदा घेवून येथे गो तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी गोरक्षकांना सोबत घेवून तपासणी चौक्या लावाव्या अशी विनंती करण्यात आली आहे.www.konkantoday.com