रघुवीर घाटात कोसळणार्या दरडी रोखण्यासाठी सात ठिकाणी संरक्षक भिंती
रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणार्या व खेड शहरापासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या रघुवीर घाटात कोसळणार्या दरडींच्या कटकटीतून यंदा पर्यटकांना मुक्ती मिळणार आहे. मुसळधाार पावसामुळे कोसळणार्या दरडी रोखण्यासाठी घाटात ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाच्या संततधारेने धबधबेही प्रवाहीत झाल्याने पर्यटकांची पावले आता घाटाकडे वळणार असून विकेंडला गर्दी उसळणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक बांधकाम खात्यानेही सुसज्जता ठेवली आहे. www.konkantoday.com