
मुख्याध्यापिकेवर कारवाई नाही, तेर्ये शाळा बंद आंदोलनावर पालक ठाम
विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही, म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करणार्या शिक्षिकेविरूद्ध पालकांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी शाळेमध्ये येवून चौकशी केली. मात्र अजूनही मुख्याध्यापिकेवर कारवाई झाली नसल्याने पालक एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याचे निवेदन शिक्षणाधिकाारी यांना देत नवीन वर्षाच्या सुरूवातीला शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.www.konkantoday.com