प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना प्रणाली तोडणकर – धुळप यांना पुणे येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना प्रणाली तोडणकर – धुळप यांना नुकताच रुद्रांश फाउंडेशन पुणे आणि सिनेआर्क प्रोडक्शन यांच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023 -24 प्रदान करण्यात आला.यावेळेला या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त युनूस पठाण, बुद्ध धम्म व इतिहास अभ्यासक जयदेव जाधव उपस्थित होते. प्रणाली तोडणकर – धुळप या रत्नागिरीतील प्रथितयश भरतनाट्यम नृत्यांगना असून रत्नागिरी आणि परिसरातील मुलींना पारंपारिक नृत्याचे प्रशिक्षण देण्याचं काम ते गेली अनेक वर्ष सातत्याने करत आहेत. भरतनाट्यमच्या माध्यमातून भारतीय परंपरा जपण्याचा त्यांचं काम असून अनेक युवतीने त्यांच्याकडून भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे. नृत्यार्पण नृत्य अकादमी च्या माध्यमातून त्यांचे हे कार्य अविरत सुरू आहे.प्रणाली यांच्या या कार्याबद्दल आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नृत्यार्पाण नृत्य अकादमीच्या माध्यमातून त्या गुरुपौर्णिमा, पाडवा, नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केले आहे. पुण्यातील रुद्रांश फाउंडेशन आणि सिनेआर्क प्रोडक्शन यांच्यावतीने त्यांच्या या कामाबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आहे.