
पोलीस पाटील मानधन वाढीचा निर्णय घेतला परंतु अंमलबजावणी नाही
राज्य शासनाने मार्च महिन्यात पोलीस पाटीलांचे मानधन वाढीचा निर्णय घेतला होता. ६५०० रुपयांवरून थेट १५ हजार रुपये मानधन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. अद्यापही पोलीस पाटलांना जादा मानधनवाढीचा लाभ मिळालेला नाही.राज्य शासनाने घेतलेल्या मानधन वाढीच्या निर्णयामुळे पोलीस पाटलांनी मानधन व्यक्त केले होते. मानधनवाढीचा निर्णय होवून तीन महिने पूर्ण झाले तरीही त्याचा लाभ न मिळाल्याने पोलीस पाटील आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. www.konkantoday.com