
कोतवड्याच्या माळरानावर गावकर्यांची गाववाफबा
देवा, चार व्हयवाटीच्या देवा, आज बालगोपाल मिलून, सालाबादप्रमाणे तुला नारल देताव हाय, वल्या खोबर्या-भाताचा निवेद देताव हाय, ता मान्य करून घे, अनी पोरा-बालांसगट, गुरा-ढोरा, मुला-मानसानत सुकसंपत्ती दे. पावसा-पान्याची, शेता-भाताची भरभराट व्होवंदे, असे खणखणीत गार्हाणे घालून कोतवडे गावातील घामेळेवाडीत सर्जनशीलतेचा उत्सव असलेली अनेखी गाव-वाफ परंपरा धामेळेच्या माळरानावर पार पडली. वाफ म्हणजे रूजलेल्या भाताचा वाफा, पावसाच्या आगमनाने रूजलेेल्या वाफ्याप्रती सार्या गावाने मिळून केलेली कृतज्ञता म्हणजेच गाववाफ तांदळाच्या लुसलुशीत भाकर्या, भात, कुळथाची उकड अशा अत्यंत प्रसादाचा गावकर्यांनी आस्वाद घेतला. www.konkantoday.com