
आता ४० फूटांपेक्षा जास्त उंच होर्डिंग उभारता येणार नाही
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य शासनाने आता नवीन नियमावली तयार केली आहे. नियमावलीनुसार रस्त्याच्या पातळीपासून १० फूट आणि ४० फूटांपेक्षा जास्त उंच होर्डिंग उभारता येणार नाही. अशा नियमबाह्य प्रकारांची कोणतीही दुर्घटना घडल्यास या दुर्घटनेची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचीच असणार आहे.नुकत्याच घडलेल्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य शासनाने होर्डिंग उभारण्यासंदभांत नवीन नियमावली तयार केली आहे. राज्यात अनेक नगरपालिका, नगर पंचायती तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातही मोठमोठे होर्डिंग लावलेले दिसतात. आता या होर्डिंगचा आकार आणि उंचीबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. ९ मे २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत या तरतूदींची आधीच नोंद करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या तरतुदींचे पालन होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी आजही ४० फुटापेक्षा जास्त उंचीवर होर्डींग लावलेले दिसतात. अशावेळी कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार राहिल, असे आता राज्य शासनाने घोषित केले आहे. त्यामुळे यापुढे शहरांमध्ये तसेच महामार्गावर ४० फूटापेक्षा जास्त उंचीच्या होर्डिंगला आता परवानगी दिली जाणार नाही. www.konkantoday.com