
शहरवासियांना रविवार (दि.१६) पासून नियमित पाणीपुरवठा होणार
मान्सून जिल्ह्यात चांगला बरसत असून आतापर्यंत सरासरी २६०. ४६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. त्यामुळे नद्या, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ‘शीळ’ धरणातील पाण्याची पातळी उंचावल्याने शहरवासियांना रविवार (दि.१६) पासून नियमित पाणीपुरवठा होणार आहे.www.konkantoday.com