
लांजा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्ष नेते नगरसेवक दिलीप मुजावर यांचा शिवसेना प्रवेश
💥 उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करत शिवसेनेत दिलीप मुजावर यांचा प्रवेश
💥 आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारून केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
लांजा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मुजावर यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अखेरचा “जय महाराष्ट्र” करत शिवसेना मध्ये प्रवेश केला.
दिलीप मुजावर यांच्या प्रवेशामुळे लांजा परिसरातील शिवसेनेला नवचैतन्य मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले दिलीप मुजावर हे लांजा तालुक्यात ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बळात वाढ होणार आहे.
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मुजावर यांनी यावेळी सांगितले की,
“मी नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवला आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा खरा विकास होईल, या विश्वासाने मी पुन्हा शिवसेनेच्या झेंड्याखाली आलो आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी मुजावर यांनी पारंपरिक पद्धतीने “जय महाराष्ट्र” चा नारा देत आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
👉 लांजा-राजापूर : विरोधकांचा ‘सुफडा साफ’ करण्याची आमदार किरण सामंत यांची घोषणा!
आगामी नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा सुफडा साफ करण्याचा निर्धार आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे.
आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील विविध ठिकाणी बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू आहेत. यावेळी अनेक बडे नेते आणि स्थानिक प्रभावी कार्यकर्ते थेट आमदार किरण सामंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
सामंत यांनी सांगितले की —
“लांजा-राजापूर मतदारसंघातील जनतेने विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत फडकवू. विरोधकांचा सुफडा साफ करणे हेच आमचे लक्ष्य आहे.”*
दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकासाच्या कामांना गती मिळत असून, त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर दिसून येणार आहे.
स्थानिक पातळीवरील अनेक माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण नेते सुद्धा आमदार सामंतांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे लांजा-राजापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी पक्षप्रवेश यादरम्यान दिलीप मुजावर त्यांच्यासोबत
मुस्ताक मुजावर,, हुसेन मुजावर, अजीम मुजावर, फिरोज मुजावर, अल्लाउद्दीन मुजावर, अल्फाईझज
पाटणकर, शहाबाज मुजावर, दानिश मुजावर , शहानवाज खान, सैफअली कासू, इजान नेवरेकर, रेहान नेवरेकर , उस्मान मालदार,
राहील पटेल, दानिश पटेल, रज्जब सारंग, इम्तियाज पाटणकर, सलमान थोडगे फरान नेवरेकर हर्षद पाथरे अल्पाइज सारंग
कादिर बोबडे ,तोफिक बोबडे, शौकत बोबडे, सुफियान बोबडे,
तवकीर बोबडे, मुबारक प्रभुलकर
संतोष लांजेकर, वृषाली लांजेकर, राकेश खानविलकर, चंद्रकांत रहाटे,अभिजीत रहाटे, लहू लांजेकर, संजय लांजेकर, विष्णू चव्हाण, गणपत शेलार, विपुल लांजेकर ,सुनील सुर्वे, स्वरूपा कदम, राधा जाधव,राजू फकीर अशा अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला आहे.




