माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता शेपूट घालून गप्प बसणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा चक्क नामर्दपणा -संदीप सावंत
कोणाला काय अपेक्षित आहे हे कळण्याइतपत मी मूर्ख अजिबात नाही, मी देखील अनेक वर्षे राजकारणात घालवली आहेत. मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरे हवीत. संदीप सावंत पक्ष सोडून जाईल आणि आपला मार्ग मोकळा होईल, असा कोणाचा समज असेल तर तो चक्क भ्रम ठरेल, मी पक्षातच आहे आणि राहणार. पण कोण जाणुनबुजून अन्याय करीत असेल, तर मी भिडणारा शिवसैनिक आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता शेपूट घालून गप्प बसणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा चक्क नामर्दपणा आहे. असे आव्हान माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिले आहे.मला कोणतेही पद नको. मी पद घेणार नाही. पदाची भीक मागणारा मी शिवैनिक नाही, माझ्या नशिबात जे असेल ते मला मिळेल, त्यासाठी मला तुमच्या पायाशी येण्याची अजिबात गरज नाही. सुपुत्राला आमदार करायचे असेल तर उघड सांगा, पाठिमागून खंजीर खुपसण्याची गरजच नाही. राष्ट्रवादीत काही वर्ष संसार केल्यानंतर गनिमीकावा तुम्हाला माहित असेल पण माझ्याकडे असले काहीच नाही. मी कडवा शिवसैनिक आहे. तुम्ही जमवाजमव करा, पण जेव्हा निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठेल ना, त्यावेळी मात्र नाकीनऊ येतील. पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात मी बिलकुल नाही. पण जी प्रवृत्ती येथे बळावते आहे ना, त्याविरोधात माझा लढा आहे आणि तो राहील. कोणी हलक्यात घेवू नये. छाताडावर बसून लढेन आणि लढणार, जबाब तो करारा मिलेगा, असेही संदीप सावंत यांनी म्हटले आहे. www.konkantoday.com