
जिल्हा बँकेची 62 वर्षाची वाटचाल
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 62वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नाबार्ड पुणेचे मुख्य व्यवस्थापक यु.ड़ी़.शिरसाळकर, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, नाबार्डच्या जिल्हा विकास प्रबंधक श्रध्दा हाजीरनीस आणि जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 24 मे 1957 रोजी झाली. परंतु बँकेचे प्रत्यक्षात काम 5 डिसेंबर 1958ला सुरु झाले. गेल्या 62 वर्षामध्ये अनेक मान्यवरांनी बँकेचे अध्यक्षपद भुषवले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या बारा वर्षांमध्ये सहकार क्षेत्रामध्ये गगन भरारी घेतली आहे. 2007 पुर्वी बुडीत चाललेल्या बँकेचे अध्यक्षपद स्विकारत डॉ. तानाजीराव चोरगे यांनी जिल्हा बँकेला नफयामध्ये आणले. मार्च 2019 अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 20 कोटी 3 लाख रुपयांचा नफा झाला आहे.
बँकेकडे एकूण 2 हजार 3 कोटी 86 लाख रुपयांचा ठेवी आहेत. बँकेने आतापर्यंत 1 हजार 576 कोटी 65 लाख रुपयांची कर्जे वितरीत केली आहेत.
बँकेला आतापर्यंत 10 नामांकित पुरस्कार प्राप्त झाले असून त्यामध्ये नाबार्ड फॅसिलिटेड सीबीएस प्रोग्रॅम पुरस्कार 2012, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन तंत्रज्ञान प्रसार पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार 2015-16 सहकारनिष्ठ पुरस्कार, बँकिंग फ्रंटीयर्स पुरस्कार 2016-17 बेस्ट एचआर प्रॅक्टीस व बेस्ट डिजीटल मार्केटींग, बँको पुरस्कार 2016-17, बँकिंग फ्रंटीयर्स पुरस्कार 2017-18 बेस्ट चेअरमन व बेस्ट क्रेडिट ग्रोथ, महाराष्ट्र शासन पुरस्कार 2017-18 सहकार भुषण पुरस्कार, बँकिंग फ्रंटीयर्स पुरस्कार 2018-19 बेस्ट प्रोडक्ट इनोव्हेन पुरस्कारांचा समावेशआहे.
जिल्हा बँकेने 2012 पासून सीबीएस प्रणाली सुरु केली असून महाराष्ट्रातील दुसर् या क्रमांकाची बँक म्हणून रत्नागिरी जिल्हा बँकेची ओळख आहे.
बँकेने जिल्ह्यात 22 एटीएम सुरु केली आहेत. बँकेचा मागील सात वर्षांचा एमपीए शून्य टक्के आहे. बँक मागील 9 वर्षे ऑडिट अ वर्गात आहे़ बँकेला आयएसओ मानांकनही प्राप्त झाले आहे.
www.konkantoday.com