
पैसे घेऊन साखर व तेलाचा पुरवठा केला नाही रत्नागिरीत फसवणुकीची तक्रार दाखल
राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील राहणारे शहबाज गोलंदाज यांचेकडून साखर व तेल पुरवठा करण्यासाठी एक लाख ९४हजार रुपयाची रक्कम स्वीकारून प्रत्यक्षात मालाचा कोणताही पुरवठा केला नाही म्हणून रत्नागिरी उद्यमनगर येथील नासिर बागवाला यांच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजापूर सौंदळ येथील राहणारे फिर्यादी शहबाज गोलंदाज यांनी यातील आरोपी नासिर बागवाला यांच्या दुकानात जाऊन ३३० बॅग साखरेची पोती व २०० तेलाची बॅगची ऑर्डर दिली होती त्यासाठी त्यांनी एक लाख ९४ हजार रुपयाची रक्कमही बागवान यांना दिली होती मात्र त्यानी दिलेल्या मुदतीत ऑर्डर पूर्ण न करता माल दिला नाही व फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरोधात रत्नागिरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com